फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून ‘BJP’ हटवलं, 

मुंबई :भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी सकाळी एक फेसबुक पोस्ट केली होती. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत येत्या १३ डिसेंबरला म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते. पंकजांची फेसबुक पोस्टसध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजप हा शब्द काढला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. खरंतर, पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे. त्यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा