मुंबई , दि.३ जुन २०२० : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही, यावरून पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षे ऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवले आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ३० मे रोजी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची त्याशिवाय श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना केली होती. त्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: