जीडीपीचे आकडे दबाव टाकून बदलले जातात: सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली: अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जीडीपीचे आकडे बद्दलले जातात. असा दावा भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. नोटबंदीचा अर्थव्यवस्था आणि जीडीपीवर प्रतिकूल परिणाम होत नाही असे भासवण्याचा प्रयत्न या आकडेवारीतून केला जातो असेही स्वामी म्हणाले.

यांबाबत एक संकेतस्थळांने वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, अहमदाबादमध्ये चार्टड अकाऊंट संमेलनमध्ये स्वामी बोलत होते. तेव्हा एका व्यक्तीने त्यांना जीडीपीच्या आकड्यांचा हवाला दिला. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘हे आकडे मला सांगू नका ते खोटे आहेत. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो. कारण माझ्या वडिल्यांनी सांख्यिकी विभागाची स्थापना केली. मी नुकतंच सांख्यिकी मंत्री सदानंत गौडा यांच्यासह सांख्यिकी मंत्रालयात गेलो होते. त्यांनीच अधिकार्‍यांना तसे आदेश दिले.
कारण नोटबंदीनंतर आकडे देण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता.’ हे सांगतना मला भिती वाटत आहे. कारण याचा माझ्यावरही प्रभाव पडेल असेही स्वामींनी सांगितले.
आकडे बदलण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव होता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता असेही स्वामींनी सांगितले. म्हणून गेल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकड्यांवर विश्वास ठेवू नका असे स्वामींनी म्हटले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा