पुणे, ३ सप्टेंबर २०२२:अवकाशातील ताऱ्यांच्या समूहातून पल्सार शोधणं शक्य नव्हतं. ते पल्सार शोधण्याचं काम पुण्यातील ‘जीएमआरटी’ शास्त्रज्ञांनी केलंय. हा शोध लावण्यासाठी एक नवीन वेगळी ‘ अल्गोरिदम ‘ प्रणाली विकसित केल्याने जे पल्सार शोधता आले नव्हते, ते शोधणे सोपे होणार आहे.
अवकाशात काही प्रचंड तारे त्यांचे अनुईंधन जाळतात आणि अखेरीस सुपरनोव्हा नावाच्या हिंसक स्पोटात कोसळतात. न्युट्रॉन तारे नावाची कॉम्पॅक्ट शहराच्या आकाराची वस्तू स्पॉट अवशेषांच्या मध्यभागी राहते.
न्युट्रॉन तारे अत्यंत दाट असतात आणि त्यांच्यात विश्वात आढळणारे सर्वात मजबूत चुंबकीय क्षेत्र सामावलेले असते. ते वेगाने फिरतात आणि उत्सर्जित करण्यासाठी त्यांच्या रोट्रेशांमधून ऊर्जा काढण्यास सक्षम असतात, असा अनोखा शोध पुणे ‘ जिएचआरएस ‘ च्या शास्त्रज्ञांनी केला. स्काय सर्वेक्षणाद्वारे एनसीआरएच्या शास्त्रज्ञांच्या चमूने पूर्वी शोधलेल्या पल्सार डेटामधूनच दोन नवीन स्लो पल्सार शोधले आहेत.
न्यूजअनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड