प्रत्येक ग्रामीण घरांना नळपाणी जोडण्याद्वारे गोवा देशातील पहिले “हर घर जल” राज्य बनले

गोवा,१० ऑक्टोबर २०२० : गोवा राज्य हे प्रत्येक ग्रामीण घरांना नळपाणी जोडण्याद्वारे देशातील पहिले “हर घर जल” राज्य बनले आहे. राज्यात २ लाख ३० हजार ग्रामीण कुटुंबांना नळपाणी जोडणी देण्यात आली आहे. उत्तर गोवामध्ये १ लाख ६५ हजार ग्रामीण कुटूंबे आणि दक्षिण गोवा १९१ ग्रामपंचायतींमध्ये ९८ हजार ग्रामीण कुटूंबासह नळ जोडणीद्वारे पाइपद्वारे दिलेला पाणीपुरवठा पूर्णपणे संतृप्त आहे.

जलशक्ती मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रत्येक ग्रामीण घराला नळ जोडणी मिळू शकते आणि खासकरुन कोविड -१९ या (साथीच्या रोगाचा) सर्व देशभर प्रादुर्भाव असताना ग्रामीण भागातील नळ कनेक्शन मिळण्याची खात्री करुन घेणे ही गोव्यातील कामगिरी इतर राज्यांसाठी एक उदाहरण आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, पाणीपुरवठ्याच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य आता सेन्सर-आधारित सर्व्हिस डिलिव्हरी मॉनिटरिंग सिस्टमची योजना आखत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा