पुणे, ३१ जुलै २०२२: मॉर्टगेज फायनान्सर हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) ने शनिवारी त्याचा रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) वाढवला आहे, जो १ ऑगस्ट २०२२ पासून लागू होणार्या गृहकर्जांच्या एडजस्टेबल दरात २५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. एचडीएफसीने स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या एका फाईल मध्ये ही गोष्ट म्हटली आहे.
अनेक वेळा झाली होम लोन मध्ये वाढ
एचडीएफसी ने आपल्या हाऊसिंग लोन वर रिटेल प्राईम लेंडिंग रेट (आरपीएलआर) वाढवला आहे. ज्यावर त्यांच्या ऍडजेस्टेबल रेट होम लोन (एआरएचएल) ला १ ऑगस्ट २०२२ पासून २५ बेसिस पॉईंट पर्यंत बेंच मार्ग करण्यात आले आहे. यापूर्वी ९ जून रोजी देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त कंपनीने आरपीएलआरमध्ये ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. १ जून रोजी त्यात ५ बेसिस पॉईंट ची वाढ झाली होती. त्याच वेळी, २ मे रोजी, ५ बेसिस पॉइंट्सने आणि ९ मे रोजी दर वाढवला. त्यानंतर गृहकर्जाचे दर ३० बेसिस पॉईंटने वाढवले.
येत्या काळात आरबीआय करू शकते व्याजदरात वाढ
असा अनुमान लावला जात आहे की वाढत्या महागाईमुळे आरबीआय रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ करू शकते. आरबीआय रेपो दरात ०.३५ ते ०.५० टक्के वाढ करू शकते. त्यामुळे आरबीआयने आपल्या व्याजदरात वाढ केल्यास बँकाही आपल्या व्याजदरात वाढ करतील. यामुळे होम लोनच्या व्याजदरात देखील वाढ होईल. परिणामी इएमआय मध्ये देखील वाढ होईल. तथापि, FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना फायदा मिळेल. व्याज वाढल्यामुळे FD करणाऱ्या लोकांना जास्त व्याज मिळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे