आसाममध्ये ४७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

गुवाहाटी, ११ ऑक्टोंबर २०२२: मिझोरामची ७ वी बटालियन, बीएसएफची कचार फ्रंटियर आणि करीमगंज पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात केलेल्या, संयुक्त कारवाईत नवीन करीमगंज रेल्वे स्टेशनजवळील राष्ट्रीय महामार्ग ३७ वर एका ट्रकमधून ७६४ साबणांमध्ये पॅक केलेले ९ किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आहे. एका ड्रग्ज तस्करालाही अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी पहाटे न्यू करीमगंज रेल्वे स्थानकाजवळ एका ट्रकमधून हेरॉईन मिझोरामहून करीमगंज मार्गे त्रिपुराला नेत असताना ते जप्त करण्यात आले. या हेरॉईनचे वजन सुमारे ९.४७ किलो असून, त्याची किंमत अंदाजे ४७.४ कोटी रुपये आहे.

एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकच्या चालकाला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा