राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंबंधी ५ मे रोजी समितीचा जो निर्णय होईल तो मला मान्य – शरद पवारांची

मुंबई, ३ मे २०२३ : राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय. राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांकडून शरद पवारांची मनधरणी करण्यात आली. मात्र शरद पवार हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. निवड समितीची नव्या अध्यक्ष निवडण्याबाबत बैठक होणार असून राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ५ मे ला ठरणार. शरद पवारांनी ६ मे ची बैठक ५ मे ला घ्या, असे निर्देश दिलेत. ‘समिती जो निर्णय घेईल, तो मला मान्य’ असे शरद पवारांनी म्हटलंय.

एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा का केली नाही, याचे उत्तरही शरद पवारांनी आज दिले. खरे तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड या नेत्यांना राष्ट्रवादी हा पक्ष असल्याचे वाईट वाटले आहे. शरद पवार यांनी पक्षाशी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी केवळ कुटुंबाशी चर्चा केली, पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा केली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देताना म्हटले की, आम्हाला काही किंमत नाही?

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, ‘मी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली असती तर या निर्णयाला विरोध झाला असता. त्यामुळेच मी माझ्या निर्णयाबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली नाही. अशाप्रकारे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय राष्ट्रवादीची निवडणूक समिती ५ मे रोजी घेणार. सध्या सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांना आव्हान देणाऱ्यांमध्ये विद्यमान उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होऊ शकतो. मात्र आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा