इंदापूर, दि. १ सप्टेंबर २०२०: इंदापूर येथील सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या मानाचा पहिल्या गणपतीची विसर्जन पूजा नगराध्यक्षा अंकिता शहा आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करीत मंदिर परिसरात उभारलेल्या जागेवरच विसर्जन पिंपात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने घरच्या घरीच साजरा करण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी देखील गणपती प्रतिष्ठापना अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आली होती.
कोरोनाचे संकट दूर व्हावे तसेच सर्वांना यातून बाहेर पडण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केली. यावेळी नगरसेवक अमर गाडे, नागेश भंडारी, प्रशांत दुनाखे, महेंद्र बानकर, हमीद आत्तार, गणेश भंडारी, महेश भिंगे, अतुलकुमार ढोले उपस्थित होते.
न्यूज अन कट प्रतिनिधी- निखिल कणसे.