मंत्रीमंडळाच्या बैठकीत महापालिकांसाठी पुन्हा चार प्रभाग होणार, सूत्रांनी दिली माहिती

पुणे, ऑगस्ट २०२२: मंत्रीमंडळाच्या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकांमध्ये चार प्रभाग करण्याच्या हालचालीला वेग आला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मात्र अंमलबजावणीवर शंका व्यक्त केली जात आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील तब्बल १८ महापालिकेचा अंतिम प्रभाग रचना निश्चित झालेले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूकांचा कार्यक्रम कधीही जाहीर करण्याची शक्यता आहे. शिंदे – फडणवीस सत्तेवर आल्यानंतर चार सदस्यीय प्रभागाच्या मागणीने जोर धरला आहे. या प्रस्तावाबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी झाली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून साशंकता व्यक्त करण्यात आलीय.
राज्यातील सर्व महापालिकांची अंतिम प्रभागरचना आणि मतदार जाहीर केले असून, या संदर्भात सर्व माहिती सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा