गझलकार इलाही जमादार यांना श्रद्धांजली निमित्त कवी संमेलनाचे आयोजन

पुणे, ७ फेब्रुवरी २०२१: रुग्ण हक्क परिषद, महाराष्ट्र प्रदेश वतीने दिला जाणारा जिजाऊ रमाई पुरस्कार २०२१ यंदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल, पिंपळवृक्षाचे रोप, काही ग्रंथ, गौरवचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.

बुधवार दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, अ‍ॅड. वैशालीताई चांदणे, उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सुप्रसिद्ध गझलकार संवेदनशील कवी म्हणून ज्यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे. त्या ईलाही जमादार यांच्या आठवणी जागविण्यासाठी ‘श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी’ मानवतेच्या नावानं चांगभलं हा कवी संमेलनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पुण्यातील लाल महाल येथे हे कवी संमेलन संपन्न होईल.

या कवी संमेलनासाठी सुप्रसिद्ध कवी देवा झिंजाड, सागर काकडे, अनिल दीक्षित, दीपक करंदीकर, हृदयमानव अशोक, जित्या जाली, डॉ. शुभा लोंढे आपल्या रचना सादर करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा, असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा