पवनी- लाखांदुर रस्त्यावर कारची दुचाकीला धडक, युवक जखमी

भंडारा १ ऑगस्ट २०२४ : भंडाऱ्यातील पवनी कडून लाखांदुरला जाणाऱ्या एका भरधाव कारने, जुनोना फाट्याजवळ दुचाकीस्वार रोशन मोहरकर वय ३० याला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कार बाजूला असलेल्या बाभळीच्या झाळाला जावून आदळून क्षतीग्रस्त झाली. सदर धडकेत दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाल्यामूळे त्याला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.

पवनी तालुक्यातील जुनोना (चौ.) येथील रोशन मोहरकर हा आपल्या दुचाकीने जुनोना येथून ४.३० च्या दरम्यान पवनी कडे जाण्यास निघाला सिंदपूरी – लाखांदुर रोडवरील जुनोना फाट्याजवळ पवनीकडून लाखांदुरकडे जाणारी कार क्र. एमएच 49 सीडी 9567 ने विरुध्द दिशेने भरधाव चालवून दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात तरुण दुर फेकल्या गेल्यामूळे तो गंभीर जखमी झाला. अनियंत्रीत कार रोडच्या बाजूच्या बाभळीच्या झाडाला जावून धडकली. दुचाकीच्या पेट्रोल टॅक सह समोरच्या भागाचा पुर्ण चुराडा झाला.

उपस्थित नागरीकाच्या मदतीने जखमीला पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला सामाण्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनीधी : नितीन कुथे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा