राजुरेश्वर मंदिरात मंत्री रावसाहेब दानवे यांनी मंदिर स्वच्छता सेवा अभियानांतर्गत केली स्वच्छता

जालना २१ जानेवारी २०२४ : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजुर येथील राजुरेश्वर मंदिरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केलीय. मंदिर स्वच्छता सेवा अभियानांतर्गत मंत्री दानवे यांनी राजुरेश्र्वर मंदिराची साफसफाई केलीय.

आयोध्या नगरीत २२ जानेवारी रोजी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यानिमित्त राजुर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “माझे राजुर, माझी आयोध्या” या संकल्पनेतून आनंद उत्सव सोहळा साजरा होत आहे. आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजुरेश्वर मंदिरात मंदिर परिसराची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविले.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा