अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिल्लोड येथील नूतन इमारतचे उद्घाटन

सिल्लोड, २२ फेब्रुवारी २०२३ : सिल्लोड मतदारसंघातील अंधारी ता. सिल्लोड येथे विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करूनअंधारी येथील २ कोटी ५२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केला. तसेच येथे आयोजित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार व जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे यांचा अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित होते त्यांनी नवनिर्वाचित संचालक आणि अर्जुन पा. गाढे यांना शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, व्हाईस चेअरमन किरण पा. डोणगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, माजी सभापती रामदास पा. पालोदकर, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक केशवराव पा. तायडे, श्रीरंग पा. साळवे, बंडू पा. शिंदे, नंदकिशोर सहारे, सुनील पाटनी, प्रभाकर काळे, दारासिंग चव्हाण, दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, विश्वास दाभाडे, राजाराम पाडळे, कौतिकराव मोरे, रमेश लाठी, भावराव लोखंडे, नानासाहेब रहाटे, शेख जावेद, जयराम चिंचपुरे, पप्पू राऊत, रघुनाथ मोरे, नगरसेवक शेख सलीम हुसेन, माजी सभापती डॉ. संजय जामकर, गोविंदराव भोजने, युवासेनेचे धैर्यशील तायडे, अण्णा पांडव, विठ्ठल तायडे यांच्यासह खालेक पटेल, आबाराव तायडे, डॉ. मनोहर गोरे,अंधारी सोसायटीच्या चेअरमन सुमनबाई नारायण जाधव, व्हाईस चेअरमन युनूस पटेल, संचालक अब्दुल रहीम, लक्ष्मण पा. तायडे, जयवंता गोरे, नारायण जाधव (पेंटर), शामराव तायडे , साहेबराव पांडव, रायभान दांगोडे, शकुंतलाबाई सुदाम तायडे ,भागुबाई माधवराव तायडे, मालनबाई साहेबराव उसरे आदिंसह गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सचिन साबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा