आमदार गोपीचंद पडळकरांनी लगावली ग्रा. पं. सदस्यांच्या कानशिलात

आटपाडी, ३० एप्रिल २०२३: आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीचे मतदान सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्यात कमालीचा संघर्ष होताना दिसत आहे.

मतदान केंद्रांवर सकाळ पासून रांगा लागल्या होत्या. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले. तत्पूर्वी ११ वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांना कानशिलात लावली.

या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण आहे. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचं आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रज्ञा कदम, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आताची परिस्थिती तणावपूर्ण शांतता आहे. असं पोलिसांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा