न्यूझीलंडने १-० ने मालिका जिंकली, तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द

क्राइस्टचर्च, ३० नोव्हेंबर २०२२ : भारताने टी २० सिरीज जिंकली. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये मात्र भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या एकदिवसीय मालिकेतील सामन्यांमधील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला. दुसऱ्या व तिसऱ्या सामन्याला पावसाने हजेरी लावल्याने सामने रद्द झाले. त्यामुळे केन विलियम्सच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने १-० ने एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली.

याआधी देखील टी-२० मध्ये दोन सामने पावसामुळे रद्द झाले. एकदिवसीय सामन्यांच्या शेवटच्या मालिकेत भारतीय संघाने फक्त २१९ धावा केल्या. न्यूझीलंड संघाच्या १८ ओव्हरमध्ये १०४ धावा झाल्या होत्या; परंतु अचानक पाऊस सुरू झाल्याने सामन्याचा निकाल लावणे अवघड झाले. सामन्याचा निकाल लावण्यासाठी दोन्ही इनिंगमध्ये कमीत कमी २० ओवर खेळणे अनिवार्य आहे; परंतु पावसाच्या हजेरीने ते शक्य झाले नाही.

त्यातूनच भारतीय संघाचे फलंदाज फ्लॉप ठरले, म्हणजेच वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस विकेटवर टिकून फलंदाजी करीत होते. श्रेयस अय्यरणे ४९ धावा, तर सुंदरने ५१ धावा केल्या. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने २८, ऋषभ पंतने १०, शुभमन गिलने १३, सूर्यकुमार यादवने ६, तर दीपक हुड्डाने १२ धावा केल्या. यामानाने न्यूझीलंडने आजच्या खेळात चांगलीच कामगिरी केली. न्यूझीलंड संघाचा ओपनर फिन एलेनने ५४ चेंडूंत ५७ धावा करीत अर्धशतक पूर्ण केले. काॅन्वेने ३८ धावा पटकावल्या. भारताने एकमेव विकेट घेतली, तर न्यूझीलंडकडून डॅरेन मिचेलने ३ विकेट काढल्या. एवढेच नाही, तर ॲडम मिल्नेने सुद्धा ३ विकेट काढल्या. तर लोकी फर्ग्युसन आणि सॅंटरने प्रत्येकी १ विकेट काढली. न्यूझीलंडच्या उत्कृष्ट खेळाने पहिल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा