पंकजा मुंडे राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत?

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी सकाळी एक फेसबुक पोस्ट केली आहे. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत येत्या १३ डिसेंबरला म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. पंकजांची फेसबुक पोस्टसध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
पंकजांच्या फेसबूक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पंकजा 12 डिसेंबरला कोणता राजकीय भूकंप करतात, काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. “आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे… आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय.  पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.”
पंकजा मुंडे यांच्या फेकबूक पोस्टमधील या ओळींमुळे त्या भाजपाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे १२ तारखेला भगवानगडावर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा