चित्रपटगृहांवर ‘पठाण’ चित्रपटाचे राज्य

मुंबई, २५ जानेवारी २०२३ : शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर पदार्पण केले. त्याचा आणि दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ हा चित्रपट अनेक चर्चांचा विषय ठरला; पण आता ‘पठाण’ चित्रपटाबाबत होत असलेल्या चर्चेत कौतुकाची भर पडली आहे. २०२३ चा सर्वांत मोठा सिनेमा ‘पठाण’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खानच्या अनेक चाहत्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो चित्रपट पाहून त्यांचे रिव्ह्युज शेअर केले आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘पठाण’ चित्रपटाला साडेचार स्टार्स देत चित्रपट या वर्षात ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. चित्रपटातील शाहरुख खानची स्टाईल, पाॅवर, ॲक्शन ड्रामा, जबरदस्त अभिनय यामुळे चित्रपटाने अनेक चांगले रिव्ह्युज मिळविले आहेत. या चित्रपटात शाहरुख एका रॉ एजंटची भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे देशाला वाचविण्यासाठी शत्रूंशी लढतानाही दिसत आहे. त्याच्या याच जबरदस्त ॲक्शन्सने चाहत्यांना वेड लावले असणार यात शंकाच नाही.

अनेकांच्या मते शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट २०२३ मधील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असणार आहे. अनेक शहरांमध्ये रात्रीच्या शोजसाठी नव्हे, तर सकाळच्या शोजसाठी देखील रांगा लागल्या आहेत. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे ३०० स्क्रीन्स वाढविण्यात आल्या. आता भारतात ५,५०० आणि भारताबाहेर २,५०० अशा मिळून ८००० स्क्रीन्सवर ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा जल्लोष पाहता चित्रपट पहिल्या दिवशी ४० कोटींपर्यंतचा बिझनेस करण्याची शक्यता आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा