योग्य वेळी अचूक व्यवस्थापन केल्यास रोगाला पुर्णपणे आळा बसतो: के.बी. पाटील

माढा, १७ फेब्रुवरी २०२१: रब्बी च्या  हंगामात सध्याच्या परिस्थितीत “CMV” ( कुकुंबर मोझ्याक व्हायरस) या रोगाचा प्रादुर्भाव केळीवर झाडावर दिसत आहे. हा रोग जरी आपणा नुकसानदायक दिसत असला तरी सुधा योग्य वेळी अचूक व्यवस्थापन केल्यास रोगाला पूर्ण पणे अळा बसतो. परंतू,  अनेक केळी उत्पादकांना रोगाचे निदान लवकर होत नाही त्या मुळे  सीएम वी वाढण्याची शक्यता असते. कारण या रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींच्या वाढीसाठी सध्याचे वातावरण पोषक आहे. सर्व शिवारात रब्बीचे पिक उभे आहे मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड  आहे.

सर्वत्र ओल असल्यामुळे तनांचाप्रदुभव मोठ्या प्रमाणात आहे. घोळ, केना, विंचू, चीलाची भाजी प्रत्येक शेतात दिसत आहे. त्यामुळे  या रोगा चा प्रसार झपाट्याने होत असल्याचे प्रतिपादन जागतिक केळी तज्ञ तथा जैन इरिगेशनचे व्हा. प्रेसीडेंट डॉ. के.बी. पाटील यांनी केले.

कन्हेरगांव तालुका माढा येथील सचीन डोके यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अग्रोनोमीस्ट  किरण पाटील, धनंजय मोरे, सचीन डोके, भारत आप्पा पाटील, गणेश माने, विजय डोके, राजाभाऊ केदार , जालींदर केदार उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा