माढा तालुका भाजपाच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध…

माढा, ८ ऑक्टोंबर २०२०: मोदी सरकारनं संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडवणारे पाऊल उचललं आहे. मात्र, शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारे काँग्रेस आणि विरोधक विनाकारण अपप्रचार करून राजकारण करीत आहेत. मोदी सरकारच्या नवीन कायद्यामुळं शेतकरी बंधमुक्त होऊन तसंच दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, परंतु हे महाविकास आघाडी सरकार यात राजकारण करत असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे.

तसंच देवेंद्रजी फडणवीस सरकारनं कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या मताचा अधिकार कायदा महाविकास आघाडी सरकारनं स्थगित केला आहे. यासाठी राज्यातील या महा विकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली माढा तहसील येथे निवेदन देण्यात आलं.

यावेळी उपस्थित योगेश बोबडे अध्यक्ष माढा तालुका भाजपा, योगेश पाटील अध्यक्ष माढा तालुका युवा मोर्चा, गिरीश ताबे युवा मोर्चा अध्यक्ष टेंभुर्णी शहर, मदन मुंगळे सरचिटणीस तालुका भाजपा, सौ. गीताताई देशमुख जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा, गणेश देशमुख तालुकाध्यक्ष विधी सेल भाजप, विवेक कुंभेजकर किसान मोर्चा उपाध्यक्ष, विजय महासागर, संध्याताई कुंभेजकर तालुका अध्यक्ष महिला मोर्चा माढा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा