पुणे १८ जून २०२३: पुणे शहरातील बाईक प्रकल्प मंजुरी अभावी रखडला आहे. पुणे महापालिकेच्या ई बाईक सेवा सुरू करण्याच्या प्रकल्पाला परिवहन विभागाची अद्याप मंजुरी मिळाली नाही.
शहरात एकूण ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासह सुमारे ५००० बाईक उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मनपाने तयार केला होता. त्यापैकी ३५० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
मनपाने परवानगी दिली असली तरी परिवहन विभागाचा अद्याप निर्णय झालेला नाही. पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावर महापालिका ई-बाईक सेवा देणार आहेत. परंतु एक वर्षापासून हा प्रकल्प परिवहन विभागाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत रखडला आहे.
न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर