राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत नाजूक, डॉक्टरांनी दिलं उत्तर, फक्त प्रार्थनांचा आधार

नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२२: रुग्णालयात राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजूच्या आरोग्यासाठी प्रार्थनाच कामी येईल, असे उत्तर डॉक्टरांनीही दिल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत राजू श्रीवास्तव यांच्या जीवनाशी संबंधित त्यांचे अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक जाणकार अंधेरी पश्चिम येथे एकत्र बसून प्रार्थना करत आहेत. या मित्रांमध्ये कॉमेडियन एहसान कुरेशी, अशोक मिश्रा आणि त्यांचे बिझनेस मॅनेजर राजेश शर्मा यांचा समावेश आहे. एम्समध्ये राजूच्या अॅडमिशनवेळी राजेश शर्मा ६ दिवस दिल्लीत होते. हे मित्र दिल्लीला जाण्याच्या प्लॅनमध्ये आहेत.

राजू यांची प्रकृती खालावली

राजू श्रीवास्तव यांच्यासाठी आगामी काही तास गंभीर असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. सध्या त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलंय.

राजू आयसीयूमध्ये दाखल

राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डिओलॉजी न्यूरो सायन्स बिल्डिंगच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. राजू यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की ते परिस्थितीशी लढणारे आहेत आणि ते यावरही मात करतील. मात्र, राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या आठ दिवसांत राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा