शिवाजीनगर मतदारसंघात नगरसेवक व पदाधिकारी यांची आढावा बैठक

पुणे, १४ ऑक्टोबर २०२० : शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी आढावा बैठकीचे आयोजन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

कोरोनाच्या काळात केलेले सेवा कार्य, संघटनात्मक बांधणी, बूथ रचना, मतदारसंघातील विकासकामे, पदवीधर मतदार नोंदणी या विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटिल, भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर पुणे शहर मुरलीधर मोहोळ,आमदार सिद्धार्थ शिरोळे , संघटन सरचिटणीस राजेश पांडे, गणेश बिडकर,दत्ता खाडे , श्रीनाथ भिमाले,मतदारसंघ अध्यक्ष रवी साळेगावकर, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते .

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा