रोहित शर्मा वर ‘बिफ’ खाल्ल्याचे आरोप

नवी दिल्ली, ३ जानेवारी २०२० : गेल्या काही दिवसात टीम इंडियाचा  खेळाडूंचे रेसटॉरंट मधील एक बिल चर्चेचा विषय बनून आहे आणि या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट्सने विजय मिळवला. दोन्ही संघातील पुढील सामना ७ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तत्पुर्वी मिळालेल्या अवकाशात भारतीय क्रिकेटपटू मेलबर्नच्या एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले असता एका चाहत्याने नकळत त्यांच्या जेवणाचे बील भरले. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्याने बीलचा फोटोदेखील शेअर केला आहे. यानंतर चाहत्यांनी रोहित शर्मासह इतर उपस्थित खेळाडूंना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.माध्यमांतील वृत्तानुसार, रोहितसोबत नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि रिषभ पंत मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यांच्या बाजूला भारतीय संघाचा चाहता नवलदीप सिंग त्याच्या पत्नीसह जेवण करत बसला होता. आपल्या बाजूला आपले आवडते भारतीय क्रिकेटपटू जेवण्यासाठी आले आहेत, हे पाहून तो भलताच खूश झाला.
त्याने क्रिकेटपटूंप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना न सांगता त्यांच्या जेवणाचे बील भरले आणि त्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पण त्याने त्या बिलावरील पदार्थांची नावे हाताने झाकली होती.मात्र, या बीलमध्ये बीफ (गोमांस) आणि पोर्क या मांसाहारी पदार्थांचा समावेश असल्याचे सांगत काही चाहत्यांनी भारतीय खेळाडूंना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यातही अधिकतर चाहत्यांनी विस्फोटक फलंदाज रोहितवर निशाना साधला आहे. असे असले तरी हे  बील खरे आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या कथित बीलाच्या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले आहे की “शर्माजींचा मुलगापण बीफ खातो”. एका चाहत्याने तर “भारतीय खेळाडू जय शहा आणि सौरव गांगुलीच्या डोळ्यांआड बीफ खात आहेत”, असे म्हणत बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा