संगमनेर, २० एप्रिल २०२३: संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील श्रद्धा भगवान गुंजाळ या विधार्थिनीची पोलंड येथील युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. जगभरातून निवड झालेल्या सहा विधार्थ्यांमध्ये श्रद्धा गुंजाळ ही भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव विधार्थिनी ठरली आहे.
इंटरनॅशनल एअर अॅण्ड स्पेस प्रोग्रामसाठी केनडी स्पेस सेंटर येथे निवड झालेल्या जगातील ६० जणांपैकी श्रद्धा ही एकमेव भारतीय विद्यार्थीनी ठरली आहे. इटली, स्विझरलँड, जर्मनी, युएसए, रशिया व भारत या सहा देशांचा समावेश असून सर्वात कमी वयाची ऑनलाईन ऍस्ट्रोनोट म्हणून श्रद्धा गुंजाळ ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पुण्याच्या एमआयडी महाविद्यालयात एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग या चार वर्षांच्या पदवी शिक्षणामध्ये तीने प्रवेश घेतला आहे. शिक्षण सुरू असतानाच इंटरनॅशनल अॅस्ट्रोईट सर्च कॅम्पमध्ये सहभाग घेऊन पृथ्वीच्या दिशेने येणारा घातक अॅस्ट्रोईट तिने शोधला. या संशोधनाबद्दल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वल्ड ऑफ रेकॉर्डचा सन्मानही तिला मिळालेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर