सौरव गांगुली यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, तसेच अँजिओप्लास्टीनंतर प्रकृती स्थिर

कोलकाता, ३ जानेवारी २०२१: पूर्व भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी.सी.सी.आय चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी २ जानेवारी २०२० रोजी हृदविकाराचा झटका आला होता आणि याच कारणास्तव त्यांना कोलकाता मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे. अशात गांगुलींच्या कोरोना चाचणीविषयी मोठी माहिती पुढे येत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार गांगुलींना शनिवारी २ जानेवारी सकाळी त्याच्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना लगेचच कोलकातामधील वूडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यापुर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

याबरोबरच डॉक्टरांनी गांगुलीच्या तब्येतीबाबत अपडेट दिले आहेत. गांगुलीची पहिली अँजियोप्लास्टी यशस्वीरित्या पार पडली असून यावेळी त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला आहे. तसेच, गांगुलींच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असून एका रक्तवाहिनीत ९० टक्के ब्लॉकेज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा