महापुरुषांच्या नावाचा दुरुपयोग थांबवा शिवधर्म फाऊंडेशनचे आझाद मैदानावर आंदोलन

बारामती १६ फेब्रुवरी २०२१ : अनेक ठिकाणी व्यावसायिक हे दुकानांना थोर महापुरुषांची नावे देतातयामध्ये दारूची दुकाने ,लॉज,हॉटेल,पानशॉपला नावे दिली आहेत.या महापुरुषांच्या नावाचा वापर होऊ नये या विरोधात शिवधर्म फाऊंडेशनने मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय उपोषण करत महापुरुषांच्या नावाची विटंबना थांबवावी असे निवेदन सामाजिक न्याय मंत्री यांना दिले आहे.
सत्यशोधक महामानावांच्या नावाची होत असलेली विटंबना थांबवावी तसेच या महापुरुषांची नावे चिन्ह व वापरास प्रतिबंध कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात यावी अशी जोरदार मागणी करत आझाद मैदानावर शिवधर्म फाउंडेशन व सागरदादा मित्र समुह सातारा यांनी एकदिवसीय उपोषण केले यावेळी दिलेल्या निवेदनात छत्रपती संभाजी महाराज व इतर सत्यशोधक महापुरुषांची नावे कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे.
शिवधर्म फाउंडेशनने यापुर्वी संभाजी बिडीच्या नावाला राज्यात जोरदार विरोध करून आंदोलन केल्यावर साबळे वाघिरे कंपनीला नाव बदलण्यास भाग पाडले आहे.छत्रपती शिवाजी महाराज,शाहू, फुले,आंबेडकर अण्णाभाऊ साठे,अहिल्याबाई होळकर,लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात त्यांची आजही तरुणांना प्रेरणा मिळत आहे.या महापुरुषांच्या नावाचा वापर अवैद्य व्यवसायांना नाव देऊन त्यांची विटंबना होत असल्याचे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष दीपक काटे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा