संरक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाठीशी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख..!

वाडेबोल्हाई १४ ऑक्टोबर २०२०: पत्रकार हे समाजासाठी काम करीत असतात. त्यांच्यावर कोणी हल्ले करीत असेल, तर ती बाब खपवून घेतली जाणार नाही. कायद्याने पत्रकारांना निश्चितच संरक्षण दिले जाईल. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी नक्कीच आम्ही लक्ष घालून पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाठीशी राहून न्याय देण्याचे काम करू व पुणे जिल्ह्यातील पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यावर शहानिशा करून निश्चित कठोर कारवाई केली जाईल. असे मत स्वागत, सत्कार कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक एस. पी. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

पुणे पाषाण येथे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश पुणे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी पोलीस अधीक्षक पदावर नवनियुक्त रुजू झालेले पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस. पी अभिनव देशमुख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे सल्लागार, मार्गदर्शक उपसंपादक अशोक बालगुडे, राज्याचे उपाध्यक्ष सुनील थोरात, डीवायएसपी अनिल लांभाते, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन करडे, जिल्हा संपर्क प्रमुख उदयकांत ब्राम्हणे, हवेली तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटेकर, पत्रकार परिषद संलग्न महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा अनिता सोनवणे, महिला मंच पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षा रेश्मा लिमकर, पत्रकार परिषदेच्या दौंड तालुक्याच्या उपाध्यक्षा जुबेदा शेख, पुणे शहराचे पत्रकार अनिल खुडे, पत्रकार सतीश जाधव, लोणी काळभोरचे पत्रकार विजय काळभोर, महिला मंचच्या भोसरीच्या अध्यक्षा आम्रपाली किर्ते, पिंपरी चिंचवडच्या उपाध्यक्ष पद्मिनी पंडीत, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

स्वागत, सत्कार कार्यक्रमात पत्रकारांना मार्गदर्शन उपसंपादक अशोक बालगुडे, राज्य उपाध्यक्ष सुनील थोरात यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्तविक, आभार व नियोजन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे यांनी केले व सूत्रसंचालन जिल्हा संपर्क प्रमुख उदयकांत ब्राम्हणे यांनी केले आहे. पत्रकारांना अडचण आली तर पोलिसांची मदत मिळावी उपसंपादक अशोक बालगुडे व ग्रामीण व उपनगरातील बातमीदारांवर हल्ले होत आहेत, ही बाब समाजहितासाठी चांगली नाही. समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी बातमीदार काम करीत असतो, त्यांना अडचण आली तर पोलिसांची मदत मिळालीच पाहिजे.

तसेच पत्रकारांनी एकांगी बातमी देऊ नये तर बाजू पाहून शहानिशा करूनच बातमी प्रसिद्ध करावी सामान्यांना न्याय देण्यासाठी माझे योगदान असेल, त्यासाठी समाजाच्या हितासाठी वृतांकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजामध्ये पत्रकार बांधवांना सुरक्षिततेच्या व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांना आधार देणे गरजेचे आहे. असे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे सल्लागार, मार्गदर्शक दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे यांनी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा