गडचिरोली, दि.२९ ऑगस्ट २०२२ ; गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हिंस्र बिबट्याचा संशयास्पद रित्या मृत्यू झाला आहे. या बिबट्या च्या मृत्यूमुळे नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक आहे, विष प्रयोग करून झाला, शिकारीतून झाला, की आणखी कोणत्या कारणाने झाला याविषयी नागरिकांच्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात बिबट्याने घातलेला धुमाकूळ, तसेच नागरिकांवरील हल्ले वन्य प्राण्यांवर केलेले जीवघेणे हल्ले हे नवीन नाहीत, परंतु मागील काही महिन्यांपासून याच मृत बिबट्याने अनेक वन्य व पाळीव प्राण्यांना आपले लक्ष केले होते. अद्याप या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही त्यामुळे बिबट्याचा मृत्यू कशाने झाला या विषयी नागरिकांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वनविभागाकडूनही या बिबट्याच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. या हिंस्र बिबट्याने अनेक वन्य प्राण्यांसह पाळीव प्राण्यांनाही आपलं लक्ष्य केले होते.
या मृत बिबट्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. प्राथमिक पाहणीत या बिबट्याच्या अंगावर कुठलीही जखम आढळलेली नाही. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, यावरुन शंका उपस्थित केली जात आहे. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला आहे की बिबट्याची शिकार करण्यात आली आहे, वनविभागाकडून आता याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर