महिला आशिया चषकात टीम इंडियाची विजयी सुरुवात

पुणे, २ ऑक्टोबर २०२२ : भारतीय महिला संघाने आशिया कप २०२२ टी ट्वेंटी स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. भारताने सलामीच्या सामन्यात श्रीलंका संघावर ४१ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट गमावत १५० धावा केल्या. भारताने दिलेल्या १५१ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार चमारी आटापटू (५) आणि मालशा (९) धावावर लवकर बाद झाल्या. यानंतर हसिनी पेरेरा (३०) धावा वगळता इतर श्रीलंकन फलंदाजांचा भारतीय गोलंदाजीसमोर कोणीही टिकू शकला नाही. अखेर श्रीलंकेचा डाव १८ व्या षटकात १०९ धावावर आटोपला.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. स्मृती मानधना (१०)धावा आणि सहकारी सलामीवीर शेफाली वर्मा (६) धावा करुन लवकर बाद झाले. त्यानंतर भारतीय संघ अडचणीत होता पण दुखापतीतून पूरा आगमन करणाऱ्या जेमीमाने संघाचा डाव सावरला. तिने कर्णधार हरमनप्रीत कौर च्या साथीने तिसऱ्या गड्यांसाठी ९४ धावांची निर्णायक भागीदारी रचत भारताला २० षटकात ६ गडी गमावत १५० धावा पर्यंत पोहोचवला. तर टीम इंडिया कडून जेमिमा हिने सर्वाधिक ७६ धावा केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा