कन्नड तालुक्यातील पिशोर येथे ठाकरे गटाने केला विधानसभा अध्यक्षांचा निषेध

छत्रपती संभाजी नगर ११ जानेवारी २०२४ : छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर येथील पिशोर नाक्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी विधानसभा अध्यक्षांचा निषेध केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी लोकशाहीची पायमल्ली करत शिंदे गटाचे आमदार पात्र असा निकाल दिला व शिवसेनेचा धनुष्यबाणाचा व पक्षाचा हक्क व अधिकार त्यांना दिला, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले नाही. सदर निकालात पक्ष संघटनेला महत्व न देता विधिमंडळातील आमदारांच्या बहुमताला महत्त्व दिले गेले. यामध्ये राज्यघटनेच्या पक्षांतर बंदी कलम १०चे अर्थ चुकीचा लावून सत्ताधारी आमदारांच्या सोयीचा निकाल दिला.

विधानसभा अध्यक्षांनी भविष्यामध्ये कोणीही आमदार फोडून सरकार स्थापन करेल असा पायंडा पाडणारा निकाल दिल्याने भविष्यामध्ये लोकशाही पद्धतीला अस्थैर्य र्निर्माण होण्याची स्थिती आहे. यामुळे सदर निकालाचा युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिशोर शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करीत तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी पिशोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख उमेश गोकुळ मोकासे ,गोकुळ महादू डहाके, उपविभाग प्रमुख,विलास पवार विभागप्रमुख,अशोक गवनाजी मोकासे,अमोल मोकासे,भरत राजू ओपकर, प्रकाश आहेर,अनिल पुंजाजी नवले,संदीप दवंगे,समद शहा, योगेश मोकासे शकील शेख,दिनेश ओपळकर बबलू हरणकाळ,गंपू जाधव राऊत शेख,आकाश कुच्चे,विशाल गिरी, राहुल इंगळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : मिलिंद कुमार लांडगे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा