मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आरोग्य विषयक उपक्रम राबवून केला साजरा.

उस्मानाबाद, २७ जुलै २०२० : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज दिनांक २७ जुलै रोजी वाढदिवस. कोरोनाच्या या महामारीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारचे आरोग्य विषयक उपक्रम राबवून मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

लोहारा – उमरगा आमदार ज्ञानराज चौघुले, युवा नेते किरण गायकवाड,शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे,शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, बळीराम सुरवसे, योगेश तपसाळे, शरद पवार, सचिन जाधव, नाना मदनसुरे , संदीप चव्हाण, रमेश जाधव, संदीप चौगुले, आकाश मोरे आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

उमरगा येथील वार्ड क्र. १ महादेव गल्ली, काळा मठ पतंगे रोड, वार्ड क्रमांक ५ कळस तांब्या जवळ , तसेच डी सी सी बँक कॉलनी, या सर्व ठिकाणांतील नागरिकांचे तापमान तसेच त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आले. यासोबतच, आरोग्य नगर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील करण्यात आला.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा