अजब टिकलीची वादग्रस्त कहाणी

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२२ : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराने टिकली लावली नाही, म्हणून मुलाखत दिली नाही. ही स्थिती तर वादग्रस्त आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांनी केलेले वक्तव्य अजबच आहे. त्यामुळेच ते पुन्हा वादात सापडले आहे.

एका पत्रकार परिषदेत संभाजी भिडे यांनी सांगितले की, “प्रत्येक स्त्री भारतमातेचे रुप आहे आणि भारतमाता विधवा नाही. तु कुंकू लाव मग तुझ्याशी बोलेन”.
पण यावर पत्रकार मात्र जास्तच चिडले आहे. यावेळी पत्रकारांनी विविध प्रतिक्रीया सोशल मिडीयावर मांडल्या. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की, लष्करातील महिला टिकल्या लावत नाही. त्या भारतमाता नाही का ? टिकली लावली न लावली तरीही त्या तितक्याच आम्हाला माननीय आहेत.

तर एका पत्रकाराने सांगितले आहे की, तुमच्या भावना आम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. तरीही तुम्ही पत्रकारांचा अपमान करत आहात, तो तुम्ही टाळावा यातच तुमचे मोठेपण आहे.

अशा प्रकारच्या तीव्र भावना मिडीयातून येत आहेत. कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे असं म्हणतात. पण विसाव्या शतकात आता स्त्रिया सक्षम होऊन स्वबळावर पुढे जात आहे. कार्यक्षमतेला जास्त वाव देणं हे, त्याचं प्रथम कर्तव्य त्या मानत आहेत. त्यामुळे कुंकू, बांगड्यांपेक्षा त्यांना आता काम महत्वाचे वाटत आहे. त्यामुळे अशा विधानास एकाअर्थी काहीच किंमत नाही. पण संभाजी भिडेंसारख्या मोठ्या व्यक्तीकडून असे वक्तव्य शोभतही नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या विधानामुळे भिडे अडचणीत आले हे खरं…

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा