सरकारचा राज्यपालांना सरकारी विमानातून प्रवास करण्यास नकार

मुंबई, १२ फेब्रुवरी २०२१: राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सरकारी विमानाने उत्तराखंडाला जाणार होते. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांना विमानात बसल्यानंतर परवानगी नाकारल्याचे कळले.

शेवटी मग राज्यपालांवर विमानातून उतरुन राजभवनावर परतण्याची नामुष्की ओढावली. पण या घडलेल्या घटनेमुळे भाजपने पुन्हा एकदा राज्य सरकावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. तर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

“राज्य सरकारचा पोरखेळ सुरु आसून,एवढं अंहकारी सरकार आपण कधी पाहीले नाही”असे देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. तसेच राज्यपालांना विमानातून उतरवण्यात आलं, जनता या सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बरोबर राज्य सरकारने केलेल्या या कृत्यावर भाजपचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही आपले मत व्यक्त करत भूमिका स्पष्ट केली. “राज्य सरकारचे वर्तन अतिशय खराब आहे.राज्यपालांना सरकारी विमान वापरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. “असं त्यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा