आज पासून लागू होणार हे नवीन नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम

पुणे, 1 जुलै 2022: आजपासून जुलै महिना सुरू होणार आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जुलैपासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. या बदलांतर्गत सर्व काही सुरळीत राहिल्यास देशात चार नवीन लेबर कोडचे (श्रम संहिता) नियम लागू केले जातील. याशिवाय टीडीएसच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत.

क्रिप्टोकरन्सीवर 1% TDS

सरकारने क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर लागू केल्यानंतर आता 1 जुलैपासून क्रिप्टो गुंतवणूकदारांना आणखी एक झटका बसणार आहे. वास्तविक, गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या क्रिप्टो व्यवहारांवर 1 टक्के दराने TDS भरावा लागेल, मग ही क्रिप्टो ऍसेट प्रॉफिट मिळवण्यासाठी असो किंवा लॉस मध्ये विकली गेली असेल. सरकारच्या या निर्णयामागचा हेतू असा आहे की, असं केल्याने ते क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करणाऱ्यांवर नजर ठेवण्यास सक्षम असेल.

भेटवस्तूवर 10% TDS

इतर महत्त्वाच्या बदलांबद्दल सांगायचं तर, 1 जुलै 2022 पासून व्यवसायांकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर, 10 टक्के दराने टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स 6 (टीडीएस) भरावा लागेल. हा कर सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे आणि डॉक्टरांवर लागू होणार आहे. जेव्हा एखाद्या कंपनीने मार्केटिंगच्या उद्देशाने भेटवस्तू दिली असेल तेव्हा सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांना TDS भरावा लागेल, तर मोफत औषधांचे नमुने, परदेशी विमान तिकीट किंवा डॉक्टरांना मिळालेल्या इतर महागड्या भेटवस्तूंवर हा नियम लागू असेल.

एअर कंडिशनर (AC) खरेदी करणं महाग होईल

1 जुलैपासून एअर कंडिशनर खरेदी करणं महाग होणार आहे. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) ने एअर कंडिशनर्ससाठी ऊर्जा रेटिंग नियम बदलले आहेत, जे 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहेत. त्यानुसार, पहिल्या जुलैपासून 5-स्टार एसीचे रेटिंग थेट 4-स्टार होईल. नवीन एनर्जी एफिशिएंसी मार्गदर्शक तत्त्वांसह, भारतातील एसीच्या किमती आगामी काळात 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

सिंगल युज प्लास्टिकवर बंदी

1 जुलैपासून भारतात सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. सरकार आता यात कोणतीही सूट देणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळं पॅकेज्ड ज्यूस, शीतपेय आणि दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांना मोठा झटका बसलाय. 1 जुलैपासून ही बंदी लागू झाल्यानंतर शीतपेय कंपन्यांना प्लॅस्टिक स्ट्रॉ असलेली उत्पादनं विकता येणार नाहीत.

नवीन कामगार कायदे लागू होऊ शकतात

कामगार संहितेचे (लेबर कोड) नवीन नियम 1 जुलैपासून लागू होण्याची शक्यता आहे. त्याच्या अंमलबजावणीमुळं, इन हॅन्ड सॅलरी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा, पीएफ योगदान आणि ग्रॅच्युइटीवर परिणाम होईल. अहवालानुसार, या अंतर्गत जास्तीत जास्त कामाचे तास 12 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना 4 दिवसांत 48 तास म्हणजेच दररोज 12 तास काम करावं लागेल. तथापि, हा नियम एका विशिष्ट राज्याने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलू शकतो.

पॅन-आधार लिंक न केल्यास दुप्पट दंड

500 रुपयांच्या दंडासह तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची काल शेवटची तारीख होती. हे महत्त्वाचं काम करण्यासाठी 30 जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. 1 जुलै किंवा त्यानंतर हे काम केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. म्हणजेच, सध्या पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी 500 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे, 1 जुलैपासून ही कागदपत्रे लिंक करण्यासाठी तुम्हाला 1,000 रुपये दंड भरावा लागेल.

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत संभाव्य बदल

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती सुधारल्या जातात. अशा स्थितीत जुलैच्या पहिल्या दिवशीही त्यात बदल होण्याची शक्यता आहे. काही काळापासून देशातील सामान्य जनतेला गॅसच्या किमतीच्या आघाडीवर झटका दिला जात असून यावेळी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा