रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात केलं 75 टन सोनं खरेदी, जाणून घ्या आरबीआय कुठं ठेवते सोनं?

RBI गोल्ड रिझर्व्ह, 6 नोव्हेंबर 2021:  आपल्या देशात लोकांना गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खूप आवडतं.  रिझर्व्ह बँकही या प्रकरणात मागे नाही.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या एका वर्षात सुमारे 75 टन सोनं खरेदी केलं आहे.
विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँकेकडे सुमारे $640 अब्ज (सुमारे 46.83 लाख कोटी रुपये) इतका परकीय चलन साठा आहे.  यापैकी सुमारे 744 टन सोनं आहे. गेल्या 12 महिन्यांत रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यात चांगली वाढ झालीय.
 किती वाढ
रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2021 पर्यंत त्यांच्या साठ्यात 743.84 टन सोनं होतं.  हे सप्टेंबर 2020 च्या तुलनेत सुमारे 11 टक्के अधिक आहे.  सप्टेंबर 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्हमध्ये 668.25 टन सोनं होतं.  अशाप्रकारे, गेल्या 12 महिन्यांत रिझर्व्ह बँकेने 75.59 टन अतिरिक्त सोनं खरेदी केलं आहे.
 किती आहे किंमत
 सध्याचे बाजारमूल्य पाहिल्यास रिझर्व्ह बँकेच्या या सोन्याच्या साठ्याची किंमत सुमारे 3.2 लाख कोटी रुपये आहे.  इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एका वर्षात रिझर्व्ह बँकेच्या सोन्याचं मूल्य सुमारे 7,150 कोटी रुपयांनी वाढलंय.
 गेल्या दोन वर्षांत रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यात सुमारे १२५.६ टन वाढ झालीय.  यामुळं भारत हा जगातील नवव्या क्रमांकाचा सोन्याचा साठा असलेला देश बनला आहे.
 कुठं ठेवलंय सोनं
 रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, या रिझर्व्हमधील 451.54 टन सोनं परदेशात बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) च्या सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आलं आहे.  उर्वरित सुमारे 292.30 टन सोनं भारतात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा