मुंबई, २३ जानेवारी २०२३ : भारतीय नौदलाची समुद्रातील ताकद आणखी वाढणार आहे. कलवारी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आयएनएस वागीर आज नौदलात सामील होणार आहे. ही पाणबुडी पूर्णपणे भारतात बनलेली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबईद्वारे मेसर्स नेव्हल ग्रुप फ्रान्सच्या सहकार्याने तिची निर्मिती केली आहे.
भारतीय नौदलाची अद्ययावत आणि प्रगत पाणबुडी आयएनएस वागीर आज कार्यान्वित होत आहे. लवकरच ही पाणबुडी समुद्रात तैनात करण्यात येणार आहे. कलवारी श्रेणीतील ही पाचवी पाणबुडी असून, चार पाणबुड्या यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. दोन वर्षांच्या सागरी चाचण्यांनंतर वागीर नौदलात सामील होत आहे.
ही पाणबुडी ६७ मीटर लांब, २१ मीटर उंच असून, या पाणबुडीचा वेग पाण्याच्या वर ताशी २० किलोमीटर आणि पाण्याखाली ताशी ४० किलोमीटर असेल. एकत्रितपणे ५० हून अधिक खलाशी आणि नौदल अधिकारी त्यात काम करू शकतात. या पाणबुडीत सर्व हायटेक शस्त्रे आहेत, वेगही चांगला आहे आणि तिची रडार यंत्रणाही त्तम आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर