आज सर्वात लहान दिवस, असणार फक्त १० तास ४१ मिनिटं प्रकाश

पुणे, २२ डिसेंबर २०२२: या वर्षातील सर्वात लहान दिवस आज आहे. म्हणजेच २२ डिसेंबर २०२२ रोजी. कारण आहे खगोलीय घटना. हे काय आहे ते आपण नक्कीच जाणून घेऊया. पण आधी तुम्ही समजून घ्या की उद्या तुमचा दिवस १० तास ४१ मिनिटांचा आणि रात्र १३ तास १९ मिनिटांची असंल. महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आणि अंधाराचा वेळ देखील वेगवेगळ्या स्थानावर अवलंबून असतो.

२२ डिसेंबर २०२२ रोजी, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्य मकर रेषेवर लंबवत असंल. यामुळं पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असंल. मध्य भारताबद्दल बोलायचं झालं तर तिथं सूर्योदय सकाळी ७.०५ वाजता होईल. सूर्यास्त संध्याकाळी ५.४६ वाजता होईल. म्हणजे दिवसाची वेळ १० तास ४१ मिनिटं असंल आणि रात्रीची वेळ १३ तास १९ मिनिटं.

या दिवशी सूर्यप्रकाशाचा कोन २३ अंश २६ मिनिटं १७ सेकंद दक्षिणेकडं असंल. पुढील वर्षी २१ मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असंल, त्यानंतर दिवस आणि रात्र समान वेळ असेल. त्याला इंग्रजीत Winter Solstice म्हणतात. Solstice हा लॅटिन शब्द आहे जो Solstim वरून आलाय. लॅटिन शब्द सोलचा अर्थ सूर्य असा होतो तर सेस्टेअरचा अर्थ स्थिर राहणं. या दोन शब्दांना एकत्र करून संक्रांती हा शब्द तयार झालाय, ज्याचा अर्थ सूर्याचे उभे राहणे असा होतो. या नैसर्गिक बदलामुळे २२ डिसेंबरला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते.

इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी देखील २३.५ अंशांवर झुकलेली आहे. झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळं सूर्याची किरणं एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात. हिवाळ्यातील संक्रांतीच्या काळात दक्षिण गोलार्धात जास्त सूर्यप्रकाश असतो.

त्याच वेळी, उत्तर गोलार्धात कमी सूर्यप्रकाश असतो. या कारणास्तव, या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धात जास्त काळ राहतो, यामुळं येथे दिवस मोठा असतो. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये आजपासून उन्हाळा सुरू होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा