पंजाबमध्ये दुर्घटना, लुधियानातील फॅक्ट्रीतून गॅस गळती; ९ जणांचा मृत्यू , तर अनेकजण जखमी

पंजाब, ३० एप्रिल २०२३: पंजाबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पंजाबच्या लुधियाना शहरात ग्यासपुरा येथे गॅस गळती झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १० लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने जवळपासच्या तीनशे मीटरचा परिसर रिकामा केला आहे. ही दुर्घटना सकाळी आठ वाजता ग्यासपुर रोड येथे सितारा सिनेमा हॉलच्या जवळ घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत सहा ते सात जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. डॉक्टर आणि रुग्णवाहिकांच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. असं सांगण्यात आलं.

लुधियाना पश्चिमच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितले की, हे गॅस गळतीचे प्रकरण आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF टीम घटनास्थळी उपस्थित आहे आणि बचाव कार्य करेल. या घटनेत १० लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गॅस गळती मध्ये अनेक पाळीव प्राण्यांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा