ट्विटरची भरारी

सोशल मिडीयातले महत्वाचे हॅन्डल म्हणून ट्विटरकडे पाहिले जाते. अनेक राजकीय नेते , कलाकार हे ट्विटरचे चाहते आहे. अशातच भारतीयांसाठी त्यातही मुंबईकरांसाठी आनंदाची घटना म्हणजे आता ट्विटरचे नवे कार्यकारी अधिकारी हे भारतीय असून ते एक मुंबईकर आहेत. नाव पराग अग्रवाल. त्यामुळे भारतीयांच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 पराग अग्रवाल यांचे वडील अणुउर्जा संशोधन संस्थेत वरिष्ठ अधिकारी आणि आई शिक्षिका. त्यामुळे घरातूनच उच्च शिक्षणाच्या बाळकडू त्यांना मिळाले आहे. अग्रवाल यांनी २००१ मध्ये टर्कीतील आंतरराष्ट्रीय भौतिक ॲालिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्यांनी काही काळ मायक्रोसॅाफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्चमघ्ये काम केले. २०११ मध्ये ते ट्विटरच्या सेवेत रुजू झाले.
२०१७ रोजी त्यांची मुख्य तंत्रज्ञान अधिकारपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी धोरणात नवेनवे बदल केले आणि कंपनीच्या उत्पन्नात वाढ केली. त्यामुळे प्रोजेकिच ब्लू स्काय या एका प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे मावळते अधिकारी डर्सी यांच्या राजीनाम्यानंतर ही जबाबदारी अग्रवाल यांच्यावर सोपवण्यात आली. यात डर्सी यांचा संवेदनात्मक राजीनामा यांचे गूढ कायम आहे. पण आता ट्विटरला बुद्धीच्या जोरावर आणि क्षमतेवर ट्विटरला अग्रवाल अग्रक्रमांकात नेतात का, हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा