दोन कारची समोरासमोर धडक; महिला पोलीस आणि त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यु

बीड, ३० ऑगस्ट २०२२: सिरसाळा-परळी रोडवर आज सकाळी दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे आणि त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला आहे.

तर पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे आणि डॉक्टर इलियास गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी व नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या बाबतची माहिती अशी की, पोलीस कर्मचारी कोमल शिंदे या त्यांच्या मुलासोबंत कारने परळीकडे दवाखान्यात जात होत्या.

तर परळीचे डॉक्टर इलियास हे त्यांच्या कारने येत होते. याच दरम्यान सिरसाळा येथील परळी रोडवरील प्रगती मंगल कार्यालयासमोर दोन्ही कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही कार रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात एकमेकांवर आदळल्या आहेत.

या अपघातात कोमल शिंदे आणि त्यांच्या नऊ वर्ष्याच्या मुलाचा मृत्यु झाला. तर पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे आणि डॉक्टर इलियास हे गंभीर जखमी झाले आहेत. कोमल शिंदे या दिंद्रुड पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा आजारी असल्याने त्याला दवाखान्यात नेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा