नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद, एकजण जखमी

गोंदिया, २० फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून बोरतलाव पोलिस चौकीअंतर्गत असलेल्या भागात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. यात दोन पोलिस शहीद झाले, तर एकजण जखमी आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. जंगलात संशियातांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी बोरतलाव पोलिस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललित यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटरसायकलने चहा पिण्यासाठी गेले होते. चहाचे ठिकाण पोलिस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्यावर होते. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी आहे. जखमी शिपायांमुळेच सदर घटना पोलिसांना कळाली. नक्षल्यांनी मोटरसायकलला आग लावून घटनास्थाळावरून पोबारा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा