उडुपी पेजावर मठाचे स्वामी विश्वेशा तीर्थ यांचे निधन

नवी दिल्ली : कर्नाटक येथील उडुपी पेजावर मठाचे स्वामी विश्वेशा तीर्थ (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून स्वामी विश्वेशा यांची प्रकृती खालवली होती. त्यांच्यावर कर्नाटक येथील मनिपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळीच डॉक्टरांनी त्यांचा मेंदू काम करत नसल्याचे सांगत मठामध्येच व्हेंटिलेटरची सोय करत ठेवण्यास सांगितले होते. सकाळी ते बेशुद्ध होते. त्यांना सकाळी ८.३० च्या सुमारास मठामध्ये हलविण्यात आले होते. मात्र, सकाळी ९.३०च्या सुमारास त्यांची प्राण ज्योत मालवली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

उडुपीचे आमदार रघुपती भट यांनी सांगितले की, विश्वेशा यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यात दुःखाचे सावट पसरले आहे. तसेच स्वामींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज अजराकाडूच्या महात्मा गांधी मैदानात तीन तासांसाठी ठेवण्यात येणार आहे.
त्यांच्या जाण्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा