अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर वॅगनर आदळून आपघात

पालघर २७ जून २०२० : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी वॅगनर कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.

या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. जखमीला
रूग्णालयात हलविण्यात येत असताना त्याचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ओव्हरस्पीडिंग वॅगनर दुभाजकावर आदळली.
वॅगनर कार नालासोपारा येथून गुजरातमधील नवसारीकडे जात होती. महामार्गावरील तलासरीजवळ गाडी आली असता, ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी दुभाजकावर आदळून ते मुंबईकडे जाणा-या लेनवर घसरत गेली, तेथे एका स्कूटरस्वाराला तीने जोरदार धडक दिली. कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला,

पालघर पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे पोलिस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा