आहो सिग्नल मधल्या तीन रंगांचा अर्थ काय?…..

पुणे, २० जानेवारी २०२१: तुम्ही गाडी चालवत असाल आणि रस्त्यावर सिग्नल दिसणार नाही हे क्वचितच घडते. मात्र, वाहतुकीचे नियम पाळण्या साठी त्याला नियंत्रणात आणण्यासाठी काही कायदे आहेत तर काही नियम आणि आज आपण यामधील सिग्नल बद्दल जाणून घेणार आहोत.

गाडी चालवताना आपल्याला सर्व सेफ्टी सह ती हातळणे फार गरजेचं असते आणि त्या मधे ही आजच्या यंग जनरेशन ला बाईक कार म्हटलं की ते  फार उतावीळ होतात आणि नियमाचे पालन ही करत नाहीत. सिग्नल हे शहरांत असण्याचे कारण म्हणजे  वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी केलेला उपाय आहे. पण या मधे लाल, हिरवा, पिवळा रंगच का वापरतात माहिती आहे?
सिग्नलच्या रंगाचे वैशिष्ट्य…..

लाल :लाल रंगाचा लाईट यासाठी वापरला जातो की हा लाईट लांबून ही स्पष्टपणे ठळक दिसतो. सोबतच लाल रंग या गोष्टीला दर्शवतो की समोर धोका आहे, आपण थांबून जा.

हिरवा :हिरवा रंग तसा शांतीचे प्रतिक मानले जाते. ट्राफिक सिग्नलमधे  याचा वापर यासाठी केला जातो की समोर कोणताही धोका नाही आहे, आपण जाऊ शकता.

पिवळा :पिवळा रंगाबद्दल भारतातील अनेक जणांना दुमत आहे. म्हणजे अर्थ लवकर उमजत नाही. पण, याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे वाहन चालू ठेवा तुम्हाला पुढे जाण्यासाठी केव्हाही सिग्नल मिळू शकतो.

तसं देशातील अनेक राज्यांमध्ये सिग्नलचा वापर होतो.तर अनेक जणं या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. मात्र, सिग्नलचा नियम हा वाहतूक कोंडीसाठीच नाही तर चालकाच्या सुरक्षितेसाठी देखील आहे. त्या मुळे तुम्ही कधी वाहन चालवत आसाल आणि सिग्नल मिळाला तर नक्की त्याचे पालन करा. तसे महाराष्ट्र राज्यामधे मुंबई मध्ये सिग्नलचे नियम काटेकोरपणे पाळले जातात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा