नवी दिल्ली: जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. भारतात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत कोरोना मुळे दोन बळी गेले आहेत एक दिल्लीतील महिला आहे तर एक कर्नाटकातील वृद्ध व्यक्ती होते. कोरोना व्हायरस वर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण जगात प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्येक देश वैज्ञानिकांच्या आणि डॉक्टरांच्या सहाय्याने कोरोना वायरस वर उपचार आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु भारतात अनोखीच शक्कल लढवताना दिसत आहे. काही लोक यज्ञ करत आहेत तर काही भजन करत आहेत याला मानसिक दिवाळखोरी म्हणावी की अंधश्रद्धा हे समजत नाही. यात आणखी एक भर पडली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत आहेत. परंतु आजवर शास्त्रज्ञांना ते जमले नाही ते करण्याचा प्रयत्न केला अखिल भारतीय हिंदू महासभा ने. त्यांनी दावा केला आहे की गोमूत्रामुळे कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो.
अशा परिस्थितीत गोमूत्र पार्टी आयोजित केली गेली होती. या कार्यक्रमाचे एक पोस्टर व्हायरल झाले. ते पोस्टर शेअर करताना अभिनेत्री ऋचा चड्ढा म्हणाली की हा कार्यक्रम बघण्यासाठी मी उत्सुक आहे तसेच गोमूत्र कोणकोण पिणार आहे हे बघण्यासाठी देखील मी उत्सुक आहे.
ऋचा ने असे ट्विट केल्यावर एका युजरने लगेच तिला टॅग करत या गोमूत्र पार्टीचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये लोकांना गोमूत्र वाटले जात आहे तसेच ते गोमूत्र ते पित सुद्धा आहेत. हे सर्व बघून ऋचा चड्डा आश्चर्यचकित झाली आणि तिने ट्विट केले की, “नाही नाही हे अशक्य आहे मला या वरती विश्वास बसत नाही हे कसे शक्य आहे. जा कोरूना व्हायरसमुळे जगामध्ये आतापर्यंत ५००० अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत त्या वायरस वर गोमूत्र हे रामबाण उपाय म्हणून सांगितले जात आहे.