जो बिडेन बहुमतापासून केवळ ६ मतं दूर, काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांची स्थिती

वॉशिंग्टन, ५ नोव्हेंबर २०२०: अमेरिकेत अध्यक्षपदासाठी चुरशीची लढाई सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी डेमोक्रॅटिक पार्टीचे जो बिडेन विजयाच्या जवळ असल्याचं दिसत आहे. बहुमतापासून सध्या ते केवळ ६ मतांनी मागं आहेत. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही काही राज्यांमध्ये आघाडीवर आहेत, अशा परिस्थितीत शेवटी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामध्ये ट्रम्प बहुमताचा आकडा पार करू शकतील.

काय आहे सध्याची स्थिती?

सध्या जो बिडेन यांना एकूण २६४ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडं एकूण २१४ मतं आहेत. म्हणजेच जो बिडेन यांना केवळ ६ मतांची आवश्यकता आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमतासाठी ५६ मतांची आवश्यकता आहे.

कोणत्या राज्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे?

सुमारे ५ राज्यांत अजूनही मतमोजणी चालू आहे, बहुतांश राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत, त्यामुळं शेवटी त्याचा परिणाम त्यांच्या बाजूनं होऊ शकंल.

• पेनसिल्व्हेनिया – २० मतं – डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर
• उत्तर कॅरोलिना – १५ मतं – डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर
• जॉर्जिया – १६ मतं – डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर
• अलास्का – ३ मतं – डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर
• नेवाडा – ६ मतं – जो बिडेन आघाडीवर

सद्य परिस्थितीनुसार ५४ मतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनं जात आहेत तर बहुमतासाठी त्यांना ५६ मतांची आवश्यकता आहे. परंतु, जो बिडेन यांना बहुमतासाठी केवळ आणखीन ६ मतांची आवश्यकता आहे जी त्यांना मिळताना दिसत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा