सावकार आत, हस्तकांचं काय ?

बारामती, २२ नोव्हेंबर २०२०: बारामती शहरात झालेल्या सवकारी कारवाई नंतर मात्र एकही पीडित तक्रारदार तक्रार करण्यासाठी पुढं आला नाही. पोलीस प्रशासनानं नागरिकांना न घाबरत दवंडी पिटऊन पोलिसांकडं तक्रार देण्याचं आवाहन केलं आहे. यावरून अवजारांची असणारी दहशत दिसून येते तर अनेक सावकार आपल्या खबऱ्यांमार्फत पैसे नाही दिले तरी चालेल पण माझे नाव घेऊ नको असे निरोप पाठवून कारवाई मधून आपली सुटका करून घेत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

शहरात सावकारांवर केलेल्या कारवाई मध्ये शहरातील गल्ली बोळातील एक हजार रुपयांपासून व्यापारपेठेतील लाखो रुपये व्याजानं देणारे सावकार आहेत. तसंच हे आपलं नाव बाहेर येऊ नये यासाठी हस्तक
आहेत. सावकारी करणं हे कोण्या एकट्याचं काम नाही याच्या मागं असणाऱ्या हस्तकांचं काय ? दिलेले पैसे द्यायला समोरील व्यक्ती त्रास देत असंल तर त्याला शोधणं, त्याच्या घरी जाऊन दमदाटी करणं असं काम करतात पोलिसांनी या बगलबच्चन कडं पोलिसांनी मोर्चा वळविणे गरजेचं आहे.

पोलिसांनी सवकारीच्या विरोधात जी मोहीम सुरू केली आहे यासाठी शहरात दवंडी दिली तरी देखील सावकारांच्या विरोधात एकही तक्रार दाखल झाली नाही. मग घरातील एखाद्या जीव गेल्यावरच नागरिक तक्रार करणार का ? असा देखील नागरिकांच्या बाबतीत बोललं जाते आहे. तर पोलीस प्रशासनानं वारंवार आवाहन करून देखील पीडित लोक पुढं येत नाहीत एवढी या सावकारांची दहशत आहे का ? तर गल्ली बोळातील सवकारांची माहिती घेऊन पोलीस प्रशासनानं त्यांना वठणीवर आणणं गरजेचं आहे. या पूर्वी देखील सावकारी प्रकरणी अनेक अर्ज आले मात्र त्याचे पुढे काय झाले असा सवाल देखील नागरिक विचारात आहेत.तर अनेक जण सुसभ्य पणाचा अंगरखा पांघरून सावकारी सारखा धंदा करत आहेत.राजकीय पक्षांचा किंवा सामाजिक संघटनेत काम करत समाजसेवक असल्याचे चित्र निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा