‘हा’ देश दुसर्यांदा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा …

वेलिंग्टन, १५ डिसेंबर २०२०: संपूर्ण जग अजुनही कोरोनाशी झुंज देत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी, तिसरी लाट आली असतानाच एक सकारात्मक बातमी आली आहे. न्यूझीलंड हा करोनामुक्त देश झाला असून मागील दोन आठवड्यांपासून एकही कोरोना बाधित रूग्ण तिथं आढळला नाही.

न्यूझीलंड देश पूर्णपणे कोरोना मुक्त झाला असून सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. न्यूझीलंडमध्ये एकही कोरोनाबाधित नाही. त्यानंतर हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. न्यूझीलंड आता सतर्कतेच्या लेव्हल-१ च्या पातळीवर असून हा स्तर सर्वात कमी धोकादायक असल्याचे संकेत देतो.

न्यूझीलंडमध्ये आता नव्या नियमांनुसार, परदेशी प्रवाशांना देशात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर सोशल डिस्टेंसिंगचं सक्तीनं पालन करण्याची आवश्यकता नसून लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणं शक्य आहे.

पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितलं की, “न्यूझीलंड करोनापासून पूर्णपणे मुक्त झाल्याची बातमी आनंदाची आहे. ही बातमी समजल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आपण सध्या सुरक्षित आणि मजबूत स्थितीत आहोत.” सध्या तरी कोरोनापूर्व काळात पोहचणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितलं. न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्यामुळं आता पूर्ण लक्ष हे आर्थिक विकासाकडं असणार आहे. अजूनही आपलं काम संपलं नाही. मात्र, हे यशदेखील खूप मोठं आहे. नागरिकांचे यासाठी आभार मानत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं.

न्यूझीलंडमध्ये २५ मार्च रोजी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं लॉकडाउनचे निर्बंध मागं घेण्यात आले होते. तर आता पुन्हा एकदा या देशातील नागरिक मोकळा हवेत श्वास घेऊन मनमुराद जगत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा