सिद्धू पाक लष्करप्रमुखांचे मित्र; CM पदासाठी माझा विरोध: अमरिंदर

चंदीगढ, 19 सप्टेंबर 2021: पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर हल्लाबोल केला.  त्यांनी सिद्धू यांचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे मित्र म्हणून वर्णन केले.  कॅप्टन म्हणाले की, सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवल्यास ते त्याला विरोध करतील.  त्याचवेळी कॅप्टन म्हणाले की सिद्धू राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.  विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी राज्यपालांना भेटल्यानंतर कॅप्टन यांनी आपला राजीनामा सादर केला होता.  त्यांच्याशिवाय सरकारच्या सर्व मंत्र्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 ‘ते म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धू हा एक अक्षम माणूस आहे. ते एक आपत्ती ठरणार आहेत. पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्या नावाला माझा विरोध आहे. कारण त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला हा मोठा धोका असेल.राजीनाम्याबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी काय म्हणाल्या याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी जेंव्हा सकाळी माझ्या राजीनाम्याबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन बोललो तेंव्हा त्या मला ‘माफ करा अमरिंदर’ असं म्हणाल्या.
मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल सायंकाळी राजीनामा दिला आहे. पंजाबचे ते दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले होते. गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात सातत्याने धुसफूस चालू आहे. अंतिमत: त्याची परिणीती आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यात झाली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला आहे. आपल्या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट करताना त्यांनी म्हटलंय की, ज्या प्रकारे बोलणं झालं त्यावरून मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आहे. आज सकाळी मी काँग्रेसच्या अध्यक्षांशी बोललो आहे आणि मी त्यांना सांगितलंय की आज मी राजीनामा देतो आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा याप्रकारे घडतंय. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा